वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकबर चाँद शेख (वय ३९, रा. होरेब नगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा रेहान (वय १८) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अकबर शेख हे १७ मार्च रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी लोणी काळभोर परिसरातील शांताई हाॅस्पिटलसमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बराटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×