Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजेंद्र सोपान काळभोर (वय ५२, रा. सिद्राम मळा, रामदरा रस्ता, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. काळभोर यांचा मुलगा अक्षय (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काळभोर हे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी येथून निघाले होते. त्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या काळभोर यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. अघघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार भरधाव वेगात पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या काळभोर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×