Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

येरवड्यात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण मरिअप्पा पवार (वय ५६, रा. राजरत्न बुद्धविहाराजवळ, ताडीवाला रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांचा मुलगा आकाश याने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बिबवेवाडीत टाेळक्याकडून तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण पवार हे ३१ मे रोजी येरवड्यातील सादलबाबा चौकातून निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा ससून रूग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा आकाश याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सी. व्ही. बेरड तपास करत आहेत.

सोसायटीतील दोन सदनिका फोडल्या

लोणी काळभोरमधील एका सोसायटीतील दोन सदनिकाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा तीन लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत अनिकेत मधुकर मोटे (वय ३५, रा. समर्थ प्लाझा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे कदमवाक वस्ती परिसरातील समर्थ प्लाझा सोसायटीत राहायला आहेत. मोटे कुटुंबीय सदनिका बंद करुन बाहेरगावी गेले होते. १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी मोटे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून दोन लाख ९३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याच सोसायटीत राहणारे महादेव विठ्ठल कांबळे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी आणि गल्ल्यात साठविलेली रोकड असा ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. मोटे गावाहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक पैठणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×