Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

बिबवेवाडीत टाेळक्याकडून तरुणावर शस्त्राने वार

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बिबवेवाडीतील सिद्धार्थनगर परिसरात घडली. तरुणाला वाचविण्यासाठी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मित्राला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तरुणासह त्याचा मित्र जखमी झाला असून, या प्रकरणी टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीनाकडून मौजमजेसाठी वाहन चोरी – सविस्तर बातमी 

अभय रमेश साठे (वय २३, रा. सिद्धार्थनगर, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी), सचिन अरुण नागटिळक (वय ३७) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सोनवणे, आऊ चव्हाण यांच्यासह पाच ते सहा साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साठेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे मित्राच्या मुलीच्या वाढदिवसासाठी १७ ऑगस्ट रोजी गेला होता. मित्राच्या मुलीचा वाढदिवस साजरा करुन तो रात्री दहाच्या सुमारास घरासमोर थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींनी साठे याच्या डोळ्यात स्प्रे मारला. साठे याला दिसेनासे झाले. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. साठे याचा मित्र नागटिळक तेथे थांबला होता. त्याने हा प्रकार पाहिला. साठे याला वाचविण्यासाठी त्याने मध्यस्थी केली. आरोपींनी नागटिळक याला शिवीगाळ करुन डोक्यात दगड मारला. आरोपींनी शिवीगाळ करुन परिसरात दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×