Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

बारामतीत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई

सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका

marathinews24.com

बारामती – शहरातील प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कंटेनर वाहने उभी करण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष व मैत्री सेल कार्यान्वित – सविस्तर बातमी

प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पोलीस उप अधीक्षक चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर संबंधित विभागाने कारवाई करत वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्यास यापुढेही कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या संयुक्त कारवाईमुळे प्याजो कंपनी परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×