Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पीएमपीएल बस थेट दुकानात शिरली

पुण्यातील आप्पा बळवंत चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुकानात शिरल्याची घटना आप्पा बळवंत चौकात मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातात चार दुचाकी, तसेच लग्नपत्रिका दुकानातील साहित्याचे नुकसान झाले.

लेखक संपत जाधव यांना मारहाण करणारे दोघे अटकेत – सविस्तर बातमी

वडगाव बुद्रुक ते पुणे स्टेशन या मार्गावरील पीएमपी बस मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आप्पा बळवंत चौकातून निघाली होती. त्या वेळी बसचालकाचे अचानक नियंत्रण सुटले. बस रस्त्यावरील एका लग्नपत्रिका दुकानावर आदळली. त्या वेळी दुकानाच्या परिसरात ग्राहक नव्हते. दुकानाबाहेर लावलेल्या दोन दुचाकींना बसने धडक दिली. बसच्या धडकेत दुकानाच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. दुकानातील साहित्य, फर्निचरचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएमपी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बसचालकाचे नियंत्रण कसे सुटले, पीएमपी बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, या दृष्टीने पीएमपी प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. दुकानात ग्राहक नव्हते. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×