Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लेखक संपत जाधव यांना मारहाण करणारे दोघे अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

न्यायालयाकडून पोलीस कोठडी

marathinews24.com

पुणे – लेखक डाॅ. संपत जाधव आणि सहकाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात आरक्षणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक संपल्यानंतर डाॅ. जाधव आणि सहकाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी

पसार झालेले आरोपी प्रमोद शांताराम नाडे (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) , प्रवीण पोपट शेलार (वय ३६, रा. सिद्धीटेक काॅलनी, कात्रज ) यांना अटक करण्यात आली. ‘या प्रकरणाचा तपास करायचा आहे. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले पिस्तूल, तसेच फवारण्यासाठी वापरलेला ‘पेपर स्प्रे’ जप्त करायचा आहे. पसार आरोपींना अटक करायची आहे. आरोपींना पोलीस कोठडी द्यावी’, अशी विनंती सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी केली. न्यायालयाने नाडे आणि शेलार यांना गुरुवारपर्यंत (२३ एप्रिल) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×