Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न

बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक 

marathinews24.com

पुणे – २०१-बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली.

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थिनींची उत्स्फूर्त रॅली – सविस्तर बातमी 

बैठकीस सामान्य निरीक्षक डॉ. बिद्या नंद सिंह, पोलीस निरीक्षक एन. कोलंची, खर्च निरीक्षक बनोथ अखिल राम नाईक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जितेंद्र डूडी तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची तयारी, मतदान साहित्याचे नियोजन, वाहतूक आराखडा तसेच वितरण व स्वीकृती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाकडून नॉन-बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी, शस्त्र जमा (Arms Deposit) प्रक्रिया तसेच एफएसटी, एसएसटी, क्यूआरटी आणि आरसीपी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मतदारसंघात दारूबंदी आदेश लागू करून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले.

तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, फ्लाइंग स्क्वॉड आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना खर्च नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला असून कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, तक्रारींचे तात्काळ निवारण करावे व निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×