चांदणी चौकात बसचे ब्रेक निकामी झाल्याची शक्यता, चालक पोलिसांच्या ताब्यात
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बस चालकाने ६ वाहन चालकांना धडक दिल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी चांदणी चौकात घडली आहे.
बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. ब्रेक निकामी झाल्यानंतर बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच ते सहा वाहनांना धडक दिल्यामुळे अपघातात तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी
कोथरूड भागातील पौड रस्त्यावर पीएमपीचे आगार आहे. पौड रस्त्यावरील आगारात सीएनजी भरण्यासाठी पीएमपी बस निघाली होती. चांदणी चौकातील उतारावर पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाले. बसचालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला लावलेल्या चार ते पाच वाहनांना बसने धडक दिली. अपघातात तिघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोेलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात सुदैवाने काेणी गंभीर जखमी झाले नाही.
बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची माहिती चालकाने दिली. अपघातानंतर काही काळ चांदणी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली, असे पोलीस उपायुक्त कदम यांनी सांगितले. अपघातानंतर या भागात गर्दी झाली होती. या भागात पीएमपी बस नादुरस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडतात, असे नागरिकांनी सांगितले.
पीएमपीएल बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाने वाहनांना धडक दिल्याची घटना चांदणी चौकात घडली आहे. अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,अधिक चौकशी सुरू आहे. – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त