Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पीएमपीएल वाहकाच्या तत्परता, महिलेचे दागिने चोरणार्‍याला पाठलाग करून पकडले

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

पुणे महापालिका भवन परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल वाहकाच्या धाडसामुळे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. जेष्ठ प्रवासी महिलेला मदतीने बहाण्याने त्यांच्या हातातील बांगडी कटरने तोडून पसार झालेल्या चोरट्याला पीएमपीएल वाहकाने पाठलाग करुन पकडले. वाहकाच्या तत्परतेमुळे चोरटा गजाआड झाला आहे. लखन सुहास जाधव (वय ३०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार चाँद शेख (रा़ मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेणू हाडु साहु (वय ५६, रा. आनंदनगर, सणसवाडी ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रेणू साहू सोमवारी (दि. १५) सायंकाळी पावणेपाच वाजता सणसवाडीतून पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. महापालिका भवन परिसरातील थांब्यावर बस थांबली. त्यावेळी साहू बसमधून उतरत असताना जाधव आणि साथीदार शेखने महिलेला मदतीचा बहाणा केला. महिलेची पिशवी धरून तिला उतरण्यास मदतीचा बहाणा केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची पिशवी घट्ट धरून ठेवली. वाहकाने महिलेला बसमधून उतरण्यास सांगितले. तेव्हा तिने माझी पिशवी दोघांनी घट्ट धरून ठेवली आहे, असे वाहकाला सांगितले. त्यानंतर चोरटे पीएमपी बसमधून उडी मारुन पसार झाले.

हातातील बांगडी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर साहू यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर वाहकाने पाठलाग करून चोरटा जाधवला पकडले. त्याच्याबरोबर असलेला साथीदार शेख पसार झाला. घटनेची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिली. वाहकाने चोरटा जाधवला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले आहे.सहायक पोलीस निरीक्षक दीपक रोमाडे तपास करत आहेत. दरम्यान, वर्षभरपासून बसप्रवासात प्रवासी महिलांकडील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेउन चोरटे कटरचा वापर करुन महिलांच्या हातातील बांगड्या कापून चोरून नेत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×