Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात पीएमपीएल प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ६ लाख ९० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५४ वर्षीय महिला मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील रहिवासी आहेत.

मिठाई विक्री दुकानातून ७० हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून ३० मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रवास करत होत्या. पुणे -सोलापूर रस्त्यावर हडपसमधील वैदुवाडी परिसरात पीएमपी बसमध्ये तक्रारदार महिलेच्या शेजारी थांबलेल्या एका चोरट्या महिलेने उलटी आल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेला चोरट्या महिलेने धक्का दिला. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले ६ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक इनामदार तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविण्याची आणखी एक घटना भवानी पेठ परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादार ज्येष्ठ महिला पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. महिलेच्या शेजारील आसनावर बसलेल्या महिलेने त्यांना बोलण्यात गुंतवले. हातचलाखी करुन त्यांच्या गळ्यातील २८ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. सहायक पोलीस फौजदार वाघेरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×