Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पीएमपीलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या कारचा भीषण अपघात

मळवली येथे दुर्घटना, चालक आणि अंगरक्षक गंभीर जखमी

marathinews24.com

लोणावळा – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपील) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या कारला मुंबई-पुणे महामार्गावर मळवली येथे भीषण अपघात झाला आहे. अपघातात आव्हाड यांच्या वाहनाचे चालक आणि अंगरक्षक गंभीर जखमी झाले असून, महेश आव्हाड यांना सुदैवाने किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हांडेवाडीत मोटारीतून १६ लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी

महेश आव्हाड हे मुंबईहून पुण्याकडे येत असताना मळवलीजवळ हा अपघात घडला. व्हॅन चालकाने अत्यंत बेशिस्तपणे अचानक ‘यू-टर्न’ घेतला. त्यामुळे आव्हाड यांची गाडी या व्हॅनला जोरात धडकली. हा अपघात इतका भीषण होता की आव्हाड यांच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, ‘नशीब बलवत्तर होते म्हणून वाचलो’ अशी प्रतिक्रिया देताना महेश आव्हाड यांनी दिली आहे. व्हॅनच्या चालकाने बेशिस्तपणे रस्त्यातच यू-टर्न घेतल्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये आमचा चालक आणि बॉडीगार्ड दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलाही थोडा मुक्का मार लागला असून गाडीची अवस्था खूप खराब झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

अपघातात जखमी झालेल्या चालक आणि अंगरक्षकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बेशिस्त मिनी व्हॅन चालकावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीमुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीला झालेला हा अपघात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×