Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा ‘मास्टर प्लॅन’ गतिमान करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा ‘मास्टर प्लॅन’ गतिमान करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

इनर रिंग रोड, मेट्रो लाईन-३, मल्टिमोडल हब, औद्योगिक व पर्यटन कनेक्टिव्हिटीसह पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमनसह नदी प्रदूषण नियंत्रणाला प्राधान्य देण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार याच्या सूचना

marathinews24.com

मुंबई – पुणे जिल्ह्याच्या नियोजित व सर्वांगीण विकासामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.

श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘प्रेम मंदिर’ सजावटीचे उद्घाटन सोमवारी – सविस्तर बातमी 

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, सह आयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, प्रभारी सह आयुक्त (अनधिकृत बांधकाम) हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विशेष प्रकल्प रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह पीएमआरडीएचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे.

इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर

पुणे इनर रिंग रोड, सीएमपी कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल, यवत रेल्वे ब्रिज आदी प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी, पर्यटन कनेक्टिव्हिटी तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोला गती

पुण्यातील माण–हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण–हिंजवडी–शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानके पूर्ण झाली असून, आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर आणण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य

पुणे महानगर प्रदेशातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, संबंधित यंत्रणा आणि संस्था स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या शाश्वत होणे आवश्यक आहे. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती आणि संचालनाचा खर्चही सक्षमपणे भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अग्निशमन केंद्रांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या सूचना

पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेऊन अग्निसुरक्षेची यंत्रणा सक्षम करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना आवश्यक ती गती देऊन पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन

पीएमआरडीए क्षेत्रात वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच दीर्घकालीन नियोजनातून सोडवावा त्यासाठी नवीन पाण्याची स्त्रोत उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा एकत्रित विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

पुणे महानगर प्रदेशाचा विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×