Breking News
पुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले

पोलीस आयुक्तांकडून नगरसेवकांशी संवाद

स्थानिक समस्या सोडविण्यास प्राधान्य

marathinews24.com

पुणे – शहरातील वाहतूक सोडविणे; तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त हे स्थानिक समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी – सविस्तर बातमी

पुणे पाेलिसांच्या परिमंडळ एक अंतर्गत शहरातील मध्य भागाचा समावेश होतो. या भागातील नगरसेवकांची बैठक परिमंडळ एक उपायुक्त कार्यालयात (फरासखाना-विश्रामबाग) नुकतीच आयोजित करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाेडे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत विश्रा्मबाग, फरासखाना, खडक, समर्थ, डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

मध्यभागातील समस्या, वाहतूक कोंडी, नगरसेवकांच्या अपेक्षा याबाबत चर्चा करण्यात आली. स्थानिक समस्या नगसेवकांच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत सहज पोहोचू शकतात’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. ‘नगसेवक हे नागरिक आणि पोेलिसांमधील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांनी स्थानिक नगरसेवकांशी नियमित संवाद साधावा. नगरसेवकांनी प्रभागातील वाहतूक समस्या, गुन्हेगारी, अमली पदार्थ विक्री, तसेच गैरप्रकारांबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. नगरसेवकांकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन पोलिसांनी उपायोजना करणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी पोलिसांना सहकार्य करावे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नमूद केले.

‘नगरसेवक हे प्रभागाात प्रभावी व्याक्तिमत्व म्हणून ओळखले असतात. स्थानिक प्रश्नांची त्यांना जाण असते. नगरसेवकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न त्यांनी मांडावेत. यापुढील प्रत्येक परिमंडळातील नगरसेवकांशी संवाद साधण्यात येणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×