Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पोलिस शिपायासह निवृत्त उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

लाचलुचपत

वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

marathinews24.com

पुणे – वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारणारा कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिस शिपायासह त्याला मदत करणाऱ्या एका निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांची तडकाफडकी बदली केली आहे.

बाजीराव रस्त्यावरील दुकानातून रोकड चोरी – सविस्तर बातमी

सोमनाथ बापू महारनवर (३४ वर्षे, रा. शेवाळवाडी ता. हवेली) असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे तर युवराज कृष्णा फरांदे (५९ वर्षे, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) असे महारनवर याला मदत करणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका भाडेकरूसह त्याच्या घर मालकावर वीजचोरीचा गुन्हा दाखल आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्याला अटक न करण्यासाठी महारनवर याने ५ हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर घर मालकाने महारनवर याला ५ हजार रुपये दिले. या लाचेची चर्चा झाल्यानंतर महारनवर याने भाडेकरूकडे ५ हजारांची मागणी केली.

रक्कम घर मालकाला देण्यास सांगितले. तसेच सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक फरांदे याने त्यांना फोनवर लाच देण्याची मागणी करत महारनवर याला मदत केली. याबाबत भाडेकरूने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर महारनवर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सोमवारी कोंढवा पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा लावला होता. ठरल्यानंतर तक्रारदार व त्याचा घरमालक पोलिस स्टेशनसमोर गेले. त्यावेळी तेथे पोलिस शिपाई महारनवर हाही उपस्थित होता.

तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना चपतच्या पथकाने महारनवरला रंगेहाथ पकडले. तसेच महारनवर व फरांदे या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उप आयुक्त, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

पोलिस ठाण्यामध्ये किंवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध प्रकार व घडना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस आयुक्तांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात लाच स्वीकारण्याची घटना घडली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सोमवारी रात्री पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची नियंत्रण कक्षात बदली केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×