चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती बाजीराव रस्त्यावरील दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कांतीलाल धनराज रावल (वय ४२, रा. गैातम भवन, लोणार आळी, रविवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याचा मारहाणीत मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावल यांचे बाजीराव रस्त्यावर नवरत्न चिक्की हे दुकान आहे. रविवारी (१२ ऑक्टोबर) रात्री त्यांनी दुकान बंद केले. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील २५ हजारांची रोकड लांबविली. सोमवारी सकाळी दुकाना उघडण्यासाठी रावल आले. तेव्हा दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.





















