Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याचा मारहाणीत मृत्यू

भंगार माल दुकानदारासह ११ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – भंगार माल दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. मारहाणीत चोरट्याबरोबर असलेले दोघे जण जखमी झाले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भंगार माल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाज इम्तियाज खान (वय २६, सध्या रा. भवानी पेठ, मूळ रा. बंगळुरू) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. मारहाणीत अमीद अफजल अहमद (वय १९), अश्रफ मेहबूब शेख (वय २६) जखमी झाले आहेत.

गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगरचे पोलीस रडारवर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील सोपाननगर परिसरात मोहम्मद स्क्रॅप सेंटर आहे. नवाज, अमीद, अश्रफ हे मूळचे बंगळुरूतील आहेत. ते एका मोटार दुरुस्ती गॅरेजमध्ये काम करतात. तिघे जण सध्या भवान पेठेत राहायला आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास वडगाव शेरीतील माेहम्मद स्क्रॅप सेंटरचा छताचा पत्रा उचकटून तिघे जण आत शिरले. त्यावेळी भंगार माल दुकानात १० कामगार झोपले होते. आवाज ऐकून दुकानातील कामगार झोपेतनू जागे झाले. त्यांनी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या नवाज, अमीद, अश्रफला पकडले. त्यांना पाइपने बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघे जण गंभीर जखमी झाले.

कामगारांनी घटनेची माहिती दुकानदााराला मिळाली. त्यानंतर तो तेथे आला. त्याने पुन्हा तिघांना बेदम मारहाण केली. मारहाणीत नवाज याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दुकान मालकासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींमध्ये अल्पवयीनाचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक ढाकणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×