Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगरचे पोलीस रडारवर

गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगरचे पोलीस रडारवर

बनावट कागदपत्रे सादर करून अहिल्यानगर येथून मिळविला होता पासपोर्ट 

marathinews24.com

पुणे – बनावट कागदपत्रे सादर करून कुख्यात गुंड निलेश घायवळने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळविला होता. त्याप्रकरणी आता पुणे पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अहिल्यानगरचे पोलीस अडकले आहेत. त्यानुसार अहिल्यानगरमधील पोलिस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यावेळी हे दोघे जिल्हा विशेष शाखेत (डिएसबी) कार्यरत होते. त्यांना पासपोर्ट संदर्भातील चौकशीबाबत हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

चोरीच्या मोटारीतून प्रवास करीत घरफोड्या, सराईताला अटक – सविस्तर बातमी 

गुंड निलेश घायवळ याने २०१९ मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे. तेथील पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला. त्यावेळी कागदपत्रांची व राहत्या पत्याची पडताळणी अहमदपूर पोलिसांनी केली होती. मात्र, त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखवला. त्याच्या आडनावातील हेराफेरीमुळे गुन्हे प्रणालीतून त्याचे नाव सुटले असावे असा कयास लावला जातो आहे. मात्र दुसरीकडे डिएसबीमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना तो माहीती नसावा असे देखील नाही असा संशय व्यक्त केला जातोय.

पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्रांचा तपशील मागवून चौकशी सुरू केली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी दिलेल्या अहवालात विसंगती असल्याचे लक्षात आल्याने, विशेष शाखेतील पासपोर्ट विभागात असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गुंड निलेश घायवळ सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून, त्याच्या टोळीवर पोलिसांनी अलीकडेच आर्थिक तपास आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पासपोर्ट प्रकरणात आडनावाच्या नवीन घडामोडी समोर आल्याने त्याला मदत कोणी केली, कोणाच्या संगनमताने पासपोर्ट पडताळणी पार पडली, याकडे लक्ष लागले आहे.

घायवळच्या अडचणीत वाढ, आणखी गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे बनवून एकाच्या नावावर परवानगी शिवाय गुंड निलेशने सिमकार्ड खरेदी केले आहे. त्यानुसार घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×