Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात पत्नीचा छळ करणार्‍या पोलीस हवालदार निलंबित

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबित

ड्युटीच्या नावाखाली पबमध्ये महिलेसोबत नशापाणी

marathinews24.com

पुणे – कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी असल्याच्यी बतावणी करीत प्रत्यक्षात पबमध्ये दुसर्‍या महिलेबरोबर दारू पीत बसलेल्या हवालदार नवर्‍याला पत्नीने रंगेहात पकडले. त्यानंतर रागातून सातत्याने पत्नीचा छळ करणार्‍या पोलीस हवालदारासह निलंबित करण्यात आले आहे. पोलीस हवालदार हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.

पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस कायम – सविस्तर बातमी

हवालदार हनुमंत कांबळे हा काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता. त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कांबळेचे २०१३ मध्ये लग्न झाले असून, त्याला दोन मुले आहेत. मागील दीड वर्षापासून त्याचे घरी येणे अनियमित झाले. कामावरुन येण्यास उशिर झाल्याबाबत पत्नीने विचारल्यावर मला तपास लागला आहे, मला मयत लागले आहे. मी ससून मध्ये आहे, अशी कारणे सांगत होता. पत्नीला शंका आल्याने तिने मोबाईल तपासला असता, हनुमंत हा महिलेशी सतत चॅटिंग करत असल्याचे दिसून आले. पत्नीने एकदा हनुमंतला रात्री फोन केल्यावर त्याने कोम्बींगची ड्युटी असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवडमधील सी डॉक पबमध्ये महिलेसोबत दारु पित बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर मी पोलीस आहे. माझे काही होणार नाही, तु काही करु शकत नाही, असे बोलला.

काही दिवसांनी त्याने मी पुन्हा असे वागणार नाही, मी सुधारलो आहे, असे पत्नीला सांगितल्याने त्या पुन्हा सासरी गेल्या होत्या. एके दिवशी त्यांना रामटेकडी इंडस्ट्रीयल भागात कांबळे पुन्हा बाईसोबत असल्याचे दिसून आले. तो सातत्याने महिलेसोबतच बोलत असल्याचेही स्पष्ट झाले. ५ मे २०२६ रोजी रात्रपाळी ड्युटी करुन हनुमंत कांबळे हा घरी न आल्याने पत्नी महिलेच्या घरी गेली. तिने दार वाजविल्यावरही दार उघडले गेले नाही. तेव्हा घरमालकाने गॅलरीतून पोलीस उडी मारुन गेल्याचे सांगितले. तेव्हा तिने जाब विचारल्यावर ‘तू तिथे कशाला तमाशा करायला गेली आहे. मी तुला मारीन, मला तुझ्यासोबत रहायचे नाही, मी तुला घटस्फोट देईन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर पत्नीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ. सागर कवडे यांनी कांबळेला निलंबित केले आहे.

कोरेगाव पार्क ठाण्यातील हवालदार गणेश कस्पटे निलंबित

हैद्राबादमधील चेक बाऊंन्सच्या केसमध्ये नॉनबेलेबल वॉरंट न बजावण्यासाठी ५ लाखांची खंडणी उकळल्यानंतरही दीड लाख रुपये घेताना पोलीस हवालदार गणेश कस्पटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली गेली. न्यायालयाने त्याला १० मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेउन पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी हवालदार गणेश कस्पटे याला निलंबित केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×