Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Police Extortion Case Pune : पुण्यात किराणा माल व्यावसायिकाकडे मागितली ५ लाखांची खंडणी

Pune Crime News

पोलिसासह दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – किराणा माल दुकानात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलीस शिपायासह दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसंनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने एक लाख ६५ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले अहो. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामकिसन हंबर्डे, सतीश माेरे (रा. वडकी, हडपसर सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका किराणा माल दुकानदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्या, ६ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार किराणा माल व्यापाऱ्याचे हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात दुकान आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलीस कर्मचारी आणि त्याचाबरोबर असलेला एक आरोपी दुकानात आले. किराणा माल दुकानात गुटखा विक्री करत असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी धमकी पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने किराणा माल दुकानदाराकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या वेळी एवढी रक्कम देेणे शक्य नसल्याचे किराणा माल दुकानदाराने दोघांना सांगितले. तडजोडीत पोलीस कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने त्याच्याकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सीसीटीव्ही चित्रीकरणात खंडणीचा प्रकार धमकावून पैसे घेतल्यानंतर दुकानदााने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत. किराणा माल दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. सीसीटीव्ही चित्रीकरण समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचाऱ्याचे संभाषण सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळले. पोलीस कर्मचारी साध्या वेशात दुकानात आला होता. किराणा माल दुकानातील कामगाराने रोकड आणून पोलीस कर्मचाऱ्याला दिल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×