Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त पोलीस दल सज्ज, ७ हजारांचा बंदोबस्त

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

marathinews24.com

पुणे – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल ७ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच महिला सुरक्षिततेसाठी गुन्हे शाखेची विविध पथके दक्ष आहेत. पालखीच्या अनुषंगाने शहरातील विविध भागात ९ ते ११ जुलै कालावधीत वाहतूकीत बदल केले आहेत. जागोजागी ट्राफिक वळविले असून, पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे उपस्थित होते.

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदीत गर्दी टाळावी; वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन – सविस्तर बातमी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पालखी सोहळा ९ जुलैला संध्याकाळी एकत्रित पुणे मुक्कामी येणार असून, त्यादृष्टीने स्थानिक पोलिसांसह क्युआरटी, बीडीडीएस पथक, पोलीस अमलदार असा ७ हजारांहून अधिक बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबत १ हजार १२० होमगार्ड, महिलांच्या सुरक्षिततेसह चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची सेवा करण्यासाठी वाहतूक विभागाने केलेल्या आवाहनुसार १ हजार ४२८ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांना ठिकठिकाणी नियुक्त केले जाणार असून, टी-शर्ट, टोपी, शिट्टी देण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल व्हॅनद्वारे वारकर्‍यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

शहरात ८ ते ११ जुलै अवजड वाहनांना बंदी

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने ८ जुलै ते ११ जुलै रात्री बारा वाजेपर्यंत शहरात अवजड, डंपर, मिक्सर वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली आहे. अत्यावश्यक वाहने वगळता खालील चौकात वाहतूक बंदी केली आहे. बोपोडी चौक, राजीव गांधी चौक, औंध, ब्रेमेन चौक औध, बोपखेल फाटा विश्रांतवाडी, खराडी बायपास चौक जकातनाका, केसनंद फाटा चौक वाघोली, लोणीकंद (थेउर फाटा), केसनंद गाव, तुळापूर फाटा (लोणीकंद), राधा चौक (बाणेर), सुस रोड (बाणेर), चांदणी चौक (पौड रोड), वारजे जंक्शन, वडगाव ब्रीज धायरी, नवले ब्रीज, भुमकर चौक (कात्रज), कात्रज चौक, खडी मशीन चौक (कोंढवा), मंतरवाडी फाटा कात्रज, वैदवाडी चौक (हडपसर), थेउर फाटा, दिवे घाट, रविदर्शन (हडपसर) याठिकाणी प्रवेश बंदी आहे.

शहरात दाखल होणार्‍या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. त्यासोबतच पावसाची स्थितीमुळे त्यादृष्टीने नियोजन केले आहे. महिलांसह नागरिकांची सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. वारकर्‍यांसह भाविकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेउन पोलिसांना सहकार्य करावे.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×