Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

मेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिस सतर्क

पुण्यात साडेपाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष

marathinews24.com

पुणे – अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुणे पोलिस अर्लटवर असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या धार्मिक स्थळे, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे गस्त वाढवली आहे. तसेच, इरानमधील विद्यार्थी तसेच नागरिकांशी संपर्क करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

अमेरिका व इराण युद्धाचा तणाव वाढला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क झाले आहेत. दरम्यान, शहरात इरानमधील विद्यार्थी तसेच नागरिकांची संख्या मोठी आहे. काही भागात इराणी वस्त्या आहेत. यामुळे विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे. तसेच नागरिकांशी संपर्क ठेवण्यात आला आहे. परदेशी विद्यार्थी आणि संवेदनशील पार्श्वभूमी असलेल्या परिसरांमध्ये गस्त वाढवली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इरानच्या नागरिकांचा विझा या कालावधीत समाप्त होत असेल तर तो आपतकालीन परिस्थितीत वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

शोक सभेचे आयोजन

अमिरेकेने केलेल्या हल्यात इराणचे प्रमुख तसेच सिया पंथाचे धर्मगुरू आयेतुल्ला खामेना यांच्या मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेमुळे शहरातील कोंढवा तसेच खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिया समाजाच्या वतीने शोक सभेचे आयोजन केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शोक व्यक्त केला. तसेच, हल्याचा निषेध केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×