Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

जयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

जयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भीमा कोरेगाव परिसरास भेट

marathinews24.com

पुणे – भीमा कोेरेगाव येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी घेतला. यावेळी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखील गुप्ता उपस्थित होते. अभिवादन सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी, वाहतूक व्यवस्था याबाबतचा आढावा स्थानिक रहिवासी, तसेच आयोजकांशी चर्चा करुन घेण्यात आला.

विविध विकास कामांबद्दल पुरंदरवासीयांनी मानले शासन, प्रशासनाचे आभार – सविस्तर बातमी 

जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी १ जानेवारी रोजी राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी भीमा कोरेगाव परिसरात उपस्थित राहतात. या सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पुणे पोलीस, तसेच ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखील गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी भीमा कोरेगाव परिसरात भेट दिली. पेरणे फाटा येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपायुक्त संदीप भाजीभाकरे, उपायुक्त सोमय मुंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते.

‘यंदाही जयस्तंभ अभिवादन सोहळा उत्साहात पार पडणार आहे. त्यानिमित्ताने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×