Breking News
अभिनेता अभिजित बिचकुले पुणे पोलिसांच्या तावडीत…पोलिसाच्या बतावणीने हातचलाखी, जेष्ठांना गंडा घालणाऱ्या सराईतला बेड्याअखेर डॉ. सुशृत घैसास यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल…समाजसुधारणेचे दीपस्तंभ वै. सखाराम महाराज तडस यांची पुण्यतिथी विविध शहरांमध्ये भक्तिभावाने साजरी…सरकार तुम्हाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवारशेअर बाजारातील गुंतवणूक पडली २३ लाखांना…पुण्यातील पीएमपीएल बसप्रवास नको गं बाई, महिलांचे दागिने चोरणारी टोळी सुसाट…खाऊ घेऊन येत असताना चिमुरड्याला कारचालकाने चिरडले…खूनाच्या गुन्ह्यात तब्बल १४ वर्ष होता फरार, आरोपीला बेड्या…फिरता नारळी सप्ताह सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांची हजेरी…

पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा गडचिरोलीत केला खून, पसार आरोपीला पुण्यात पकडले

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

Marathinews24.com

पुणे – गडचिरोतील पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी नरवीर तानाजीवाडी परिसरात पकडले. विशाल ईश्वर वाळके (वय ४०, रा. सुयोगनगर, नवेगाव, गडचिरोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६४, रा़ कल्पना विहार, सुयोगनगर, नवेगाव, जि.गडचिरोली) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन काशीनाथ सोनकुसरे (वय ५७, रा. इंदिरानगर, लांझेडा,जि. गडचिरोली) यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडकी पोलिसांची तत्परता आली कामी; अवघ्या चार तासात रिक्षा चालकाला शोधले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन सोनकुसरे हे गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांची मोठी बहीण कल्पना उंदिरवाडे या गडचिरोली जिल्हा परिषदेत कक्ष अधिकारी होत्या. त्या २०१८ मध्ये निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले होते. कल्पनाचा मुलगा उत्कल (वय २५) याच्यासोबत त्या राहत होत्या. १३ एप्रिलला कल्पनाचे भाऊ पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे गडचिरोली पोलीस मुख्यालयात निघाले होते. त्यावेळी कल्पना शयनगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे यांचा भाचा उत्कल परीक्षेसाठी गेला होता.

डचिराेली पोलिसांनी तपास सुरू केला. कल्पना यांच्याकडे भाडेकरु असलेल्या आरोपी विशाल वाळकेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर त्याला पुन्हा बोलाविण्यात आले. विशाल चौकशीला उपस्थित न राहता पसार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा घटनेच्या आदल्या दिवशी तो कल्पना यांच्या घरी आला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी होती. त्याने कल्पना यांच्या मोबाइल क्रमांकावरुन काही व्यवहार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.आरोपी विशाल पुण्यात पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने त्याला नरवीर तानाजीवाडी परिसरातून ताब्यात घेतले.

गडचिरोली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण हे पुण्यात पोहोचले. पोेलिसांनी वाळके याला ताब्यात दिले. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी प्रमोद मोहिते, चौबे, आहेर, माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top