बारामतीत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा
marathinews24.com
पुणे – कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती येथे बुधवारी (७ मे) खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी,तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, आगरकर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जायभाये, महिला व पुरुष मिळून १०७ शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची केली बतावणी – सविस्तर बातमी
चौधरी यांच्या हस्ते आत्माअंतर्गत नोंदणीकृत १० शेतकरी बचत गटांना नोंद बुक व गटस्तरीय हिशोब नोंदवही तसेच साहित्याचे वाटप करण्यात आले.बांदल यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये कृषी विभागाची सविस्तर भूमिका मांडली. पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांचे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना शेतकरी बचत गट व शेतकरी बचत गटांच्या यशोगाथा याविषयी दुरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
जायभाये यांनी सोयाबीनची लागवड पद्धत त्याचबरोबर विविध वान व उत्पादनाची सविस्तर अशा पद्धतीने माहिती दिली. कृषी सहाय्यक फलटण योगेश भोंगळे यांनी ऊस पाचट व्यवस्थापन तसेच ऊस सुपर केन नर्सरीबाबत तसेच सूर्यफूल व करडई तेलबिया पिकांविषयी निमकर इन्स्टिट्यूट फलटणचे शास्त्रज्ञ देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.