पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाची मस्ती उघड…
Marathinews24.com
पुणे – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या धोरणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. तनिशा भिसे असे दगावलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिलला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक झाले आहेत. रुग्णालय प्रशासनावर कारवाई च्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
जनसंपर्क अधिकाऱ्याच्या अंगावर चिल्लर फेको आंदोलन
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर हे प्रसार माध्यमांशी बोलण्यासाठी आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकली. त्यामुळे पुण्यात रुग्णालयाबाहेर मोठा राडा सुरू झाला आहे.