Breking News
हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्नगॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हातउसने घेतलेले पैसे परत करण्याची बतावणी करुन युवतीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवतीने विरोध केल्यानंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नीलेश वाझे (वय ३९, रा. अनंतलक्ष्मी हाॅस्टेल, चैतन्यनगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाझे हा युवतीच्या ओळखीचा आहे. युवतीकडून त्याने हातउसने २० हजार रुपये घेतले होते. उसने परत करण्याची बतावणी त्याने युवतीकडे केली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पैसे परत करण्याची बतावणी करुन तो युवतीला घेऊन दुचाकीवरुन निघाला. युवतीला वाटेत शीतपेय त्याने दिले. शीतपेयात त्याने गुंगीचे ओैषध मिसळले होते. निर्जन ठिकाणी त्याने युवतीला नेले. युवतीच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर तिने आरोपीला विरोध केला. आरोपीच्या तावडीतून युवती सुटली.
तिने एका ॲपवरुन मोटार बोलाविली. मोटारीतून ती घरी आली. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार किंद्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×