शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
marathinews24.com
पुणे – शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचविणारे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांनी दिले आहेत.
पुणे : मंडप साहित्य केंद्रातून दोन लाखांची चोरी – सविस्तर बातमी
प्रतिबंधात्मक आदेश २६ मेपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत ज्वलनशील पदार्थ बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी टीका, टिप्पणी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
द्वेष निर्माण करणारी गाणी, चित्रफीत प्रसारित करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचविणारे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१), (२), (३) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.