फ्लॅटचे कुलूप तोडून सात लाखांचा ऐवज चोरीला

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडी

मंगळावर पेठेत घडली घटना

marathinews24.com

पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख २९ हजारर रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन परिसरातील रेस्टॉरंटमध्ये दरोडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मंगळवार पेठेतील शांती काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. त्या मंगळवारी (१८ नाेव्हेंबर) सायंकाळी कामानिमित्त बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून चोरट्यांनी रोकड, साेन्याचे दागिने असा सात लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तपास करत आहेत.

दरम्यान, लोहगाव भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोहगाव भागातील तपश्चर्या सोसायटीत राहायला आहेत. १५ नोव्हेंबर रोजी त्या कामानिमित्त बाहेर पडल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ९१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×