स्थानिक पोलिसांना अवैधधंदे दिसत नाहीत
marathinews24.com
पुणे – परराज्यातील मुलींकडून वेश्या व्यावसाय करून धेणार्या महिला एजंटला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने बेड्या ठोकल्या. तर तिच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना राजाराम कदम (३६, रा. मु. पो. खडकी, ता. तुळापुर, जि. धाराशिव) हिच्यासह तिच्या तिन साथीदारांविरूध्द सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दि. ७ जुलै रोजी अमली विरोधी पथक एकचे पोलिस अधिकारी आणि अमंलदार शहरात पेट्रोलिंग करताना कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी
पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एजंटची माहिती मिळाली. आरोपी सपना ही सामाजिक माध्यमातून ग्राहकांना परराज्यातील तरूणीचे फोटो ग्राहकांना पाठवून तरूणींना वेश्या गमनासाठी ग्राहकांकडे पाठवत होती. त्याबदल्यात ती स्वतः किंवा साथीदारांच्या मार्फतीने ४ हजार रूपये ग्राहकांकडून स्विकारत होती. सपना ही सिंहगड भागात ग्राहकांच्या मागणीनुसार हॉटेलमध्ये मुली वेश्या व्यावसायासाठी पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी एका परराज्यातील तरूणीचे सुटका करण्यात आली.
ही कारवाई पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, अमंलदार प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बुधवार पेठ परिसरातून वेश्या व्यवसायास लावलेल्या बांगलादेशी ८ महिलांची सुटका पुणे पोलिसांनी नुकतीच केली होती. पुणे पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय करून घेणार्या मालकिनीवर गुन्हा दाखल करत दोन अल्पवयीन मुलींसह तिघींची सुटका केली. शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय करण्यास लावल्याचे असंख्य गुन्हे दाखल होऊन कारवाई होऊनही पुन्हा काही स्पा सेंटरमध्ये हे अवैध वेश्या व्यावसायाचे उद्योग जागरूक नागरिकांच्या माहितीमुळे उजेडात येत आहे. परंतु, हे चाललेले उद्योग स्थानिक पोलिसांना दिसत नाही का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस आयुक्तांची अवैध धंद्याविरूध्द कडक भुमिका असताना आयुक्तांचे आदेश डोळ्याआड करण्याचे काम शहरातील काही पोलिस ठाण्यांकडून होत आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलीस छाप्यात कारवाई
स्पा सेंटरच्या नावाखाली तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून आले आहे. विमानतळ परिसरात अशाचप्रकारे स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींना स्पाच्या कामाकरता ठेवून त्यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून स्पा मालक व मॅनेजर यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर अचानक छापा टाकून तीन अल्पवयीन मुलींसह चार जणींची सुटका केली असून स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे . त्यानुसार किरण आडे उर्फ अनुराधा बाबुराव आडे (वय _२८, राहणार_ खराडी, पुणे )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सदर कारवाईमध्ये १९ वर्षाची एक तरुणी, १५ वर्षाच्या तीन मुली यांची कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय मधून सुटका केली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात सदर स्पा सेंटर चालवण्यात येत होते. स्पा मध्ये ग्राहकांची मसाज करण्यासाठी विविध मुलींना कामास ठेवून त्यांना जास्त पैशांचे आमिष स्पा मालक आणि मॅनेजर यांनी दाखवले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपींनी मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले आहे .याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस बालपांडे करत आहे.