पुण्यातील चंदननगर भागात गुन्हे शाखेचा छापा; एकास अटक
Marathinews24.com
पुणे – मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेेने छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले आहे. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवुृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाला अटक केली. नगर रस्त्यावरील चंदननगर भागात ही कारवाई करण्यात आली.
राहुल सुनील सिंह (वय २४, रा. समर्थ काॅम्प्लेक्स, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सैबू शेख उर्फ सैबू मुबारक अली (रा. श्रीराम सोसायटी, चंदननगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील पोलीस हवालदार स्वाती तुपे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेतकऱ्याकडून घेतली १ लाखाची लाच – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील चंदननगर भागात इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला गुरुवारी (३ एप्रिल) मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी राहुल आणि सैबू यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राहुलला अटक करून त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.