Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आंदोलन भोवले

पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आंदोलन भोवले

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – परवानगीशिवाय आंदोलन करून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ मार्चला डेक्कनमधील एरंडवणे परिसरात असलेल्या आयएलएस लॉ कॉलेजमध्ये दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत घडला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोरमध्ये मद्यपीकडून रुग्णालयात तोडफोड – सविस्तर बातमी 

योगेश एकनाथ सुतार (वय ४४, रा. रेक्टर्स क्वार्टर्स, आयएलएस लॉ कॉलेज कॅम्पस, लॉ कॉलेज रोड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कॉलेज परिसरात बेकायदेशीर जमाव जमवला. त्यानंतर त्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांना इमारतीत ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला. याचबरोबर आंदोलक विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये सुरू असलेल्या मुलाखती व परीक्षा प्रक्रियेत व्यत्यय आणला. इतकेच नव्हे, तर काही विद्यार्थ्यांनी इमारतीत प्रवेश करून प्राचार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ निरीक्षक गिरीश निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×