Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुण्यात सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा

पुण्यात सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा

एकाचवेळी १३ सराईत तडीपार

marathinews24.com

पुणे – खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा गावठी दारूविक्री, मारामारी, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १३ सराइतांना शहर अणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर हल्ला – सविस्तर बातमी 

शारदा राजू चव्हाण (वय ४४), शांताबाई नामदेव राठोड (वय ५७), शारदा सुरेश पवार (वय २९), अनू कुमार चव्हाण (वय ३५, सर्व रा. नाईकनगर, येरवडा), नवीन ऊर्फ बच्चू मनोज वडावराव (वय २६, रा. शांतीनगर, येरवडा), अल्ताफ माेहम्मद शेख (वय २३) आदिल जावेद शेख (वय १९ दोघे रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, जुना मुंबई-पुणे रस्ता), वीरेन लक्ष्मण वाघेला (वय २३, विश्रांतवाडी), सविता नंदू राठोड (वय ३५, रा. बालेवाडी गाव), जावेद जनाशा शेख (वय ६०, रा. मंजाळकर चौक, वडारवाडी, शिवाजीनगर), विकास दुर्गादास विटकर (वय ४२, रा. वेताळबाबा झोपडपट्टी, जनवाडी, गोखलेनगर), सौरभ संभाजी डोलारे (वय २४, रा. राजीव गांधीनगर, लक्ष्मीनगर, येरवडा), संगीता बबन साठे (वय ४४, रा. यशवंतनगर, येरवडा) अशी तडीपार केलेल्या सराइतांची नावे आहेत.

गणेशोत्सव शांतेतत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून परिमंडळ चारमधील खडकी, बाणेर, चतु:शृंगी, येरवडा, लक्ष्मीनगर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. सराइतांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तडीपार गुंड शहरात किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त रजनिकांत चिलुमुला यांनी केले आहे.

मोटारीच्या धडकेत वासराचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत वासराचा मृत्यू झाल्याची घटना तळजाई पठार परिसरात घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध सहकारनगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ॲड. अमित शहा (वय ४१) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देेण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तळजाई पठार परिसरातील लुंकड शाळेजवळ रस्त्यात फिरणाऱ्या वासराला मोटारीने धडक दिल्याची घटना नुकतीच घडली. मोटारीच्या धडकेत वासराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना न कळविता मोटार चालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक टी. पी. केंद्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×