पुणे सातारा रस्ता, हडपसर भागामध्ये अपघाताच्या घटना: दोन ज्येष्ठ महिलांचा मृत्यू
marathinews24.com
पुणे – शहरात वेगेवगळ्या अपघातांत पादचारी ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे सातारा रस्ता, तसेच हडपसर गाडीतळ भागात अपघाताच्या घटना घडल्या. पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागात रिक्षाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुतण्याने वस्तार्याने केला काकीवर वार – सविस्तर बातमी
सुमन आबासाहेब काळे (वय ६५, रा. नेहावास्तू अपार्टमेंट, भारती विद्यापीठ रस्ता, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत निकिता लिंबराज काळे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता काळे यांची आत्या सुमन या पुणे-सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकातून ९ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या सुमन यांना भरधाव रिक्षाने धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा नुकताच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप खंडागळे तपास करत आहेत.
बसच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
हडपसर गाडीतळ परिसरात बसच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कमळाबाई दादू लोंढे (वय ७९, रा. मोदीखाना, लष्कर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लोंढे यांचा मुलगा सुरेंद्र (वय ६०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमळाबाई लोंढे या गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरातील पीएमपी थांब्यावरुन सासवडकडे निघाल्या होत्या. बस स्थानकाच्या परिसरात बसने पादचारी लोंढे यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सलगर तपास करत आहेत.























