Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : पुतण्याने वस्तार्‍याने केला काकीवर वार

Pune Mobile Snatching News

आळेफाटा पोलिसांकडून आरोपीविरुद्ध कारवाई नाही, महिलेचा आरोप

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून पुतण्याने काकीवर वस्तार्‍याने वार करुन गंभीररित्या जखमी केल्याची घटना २५ ऑक्टोबरला संध्याकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास आळेफाटा मधील बेल्हेतील मुक्ताईनगर घडली आहे. घटनेनंतर तक्रारदार महिलेचे मेडीकल झाल्यावरही आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने संबंधित पोलीस निरीक्षकाची कानउघडणी केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी नीलेश शिवाजी भालेराव (रा. बेल्हे, आळेफाटा, जुन्नर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सहकारनगर मध्ये भरदिवसा महिलेची पर्स हिसकावली – सविस्तर बातमी

तक्रारदार महिला बेल्हे गावात राहायला असून, आरोपी नीलेश भालेराव हा त्यांचा पुतण्या आहे. २१ ऑक्टोबरला आरोपीने सातबार्‍यावरील पीकपाणी आणि संमतीrपत्रावर तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे खोट्या सह्या केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल्यानंतर परस्परविरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. त्यानंतर २५ ऑक्टोबरला तक्रारदार महिला दवाखान्यात जात असताना आरोपी नीलेश भालेराव याने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलेने त्याला जाब विचारला असता, तुझ्या नवर्‍याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी नीलेशने महिलेचे केस ओढून त्यांना मारहाण केली. दुकानातील वस्तार्‍याने तक्रारदार महिलेच्या दोन्ही हातावर वार करून गंभीररित्या जखमी केले.

महिलेने ११२ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला असता, आरोपी नीलेशने मी कोणाला घाबरत नाही, माझ्याकडे खुप पैसा आहे असे धमकावले. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी महिलेला औषधोपचार करण्यास रुग्णालयात पाठवले. दरम्यान, २५ ऑक्टोबरला महिलेवर संध्याकाळी वार झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी त्यांची लगेच तक्रार दाखल करुन घेतली नाही. महिलेला तब्बल ७ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. अखेर या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याने संबंधित अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर अधिकार्‍याने कानउघडणी केल्यानंतर २६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला. आरोपी नीलेश भालेराव याला यासंदर्भात पोलिसांनी अजूनही ताब्यात घेतले नाही. त्याच्याकडे विचारपूसही केली नसल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांनी याप्रकरणी आरोपी संदर्भात अधिकची माहिती घेउन सांगतो, असे सांगितले.

माझ्याकडे खूप पैसा, पोलीस काहीच करु शकत नाही

महिलेच्या दोन्ही हातावर आरोपीने वस्तार्‍याने वार करुन गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर त्याने माझ्याकडे खूप पैसा आहे, पोलीस माझे काहीच करू शकत नाही, अशी धमकी महिलेला दिली. दरम्यान, गंभीर गुन्हा असताना पोलिसांनी अजूनही आरोपीला ताब्यात का घेतले नाही, संबंधित पोलीस निरीक्षकाला वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय कारवाई होत नाही का, असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×