Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Purse Snatching : सहकारनगर मध्ये भरदिवसा महिलेची पर्स हिसकावली

पर्वती परिसरात तरुणाला वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाणधाकाने लुटले

पर्वती पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरदिवसा महिलेच्या हातातील २० हजार रुपयांची रोकड असलेली पर्स दोघाजणांनी हिसकावून नेली. ही घटना २७ ऑक्टोबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास सहकारनगर मधील श्रीकृष्ण सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात ३० लाखांची रोकड हिसकावून नेली, २२ दिवसांनी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सहकारनगर मधील श्रीकृष्ण सोसायटीत राहायला आहे. २७ ऑक्टोबरला दुपारी सव्वा एक वाजता तक्रारदार महिला घराबाहेर जाण्यासाठी परिसरातील सोसायटीत रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी दुधाच्या पैशांची मागणी करण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून नेली. पर्समध्ये २० हजारांची रोकड असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शीतल चिल्ले तपास करत आहेत.

चारित्र्य प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार; आरोपीला अटक

तरूणाला प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मूळ भाडे करारनाम्यामध्ये एडिटिंग करणे एकाच्या अंगलट आले आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. चेतन मार्कस पवार (वय ३८ रा. भेकराईनगर, हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिला पोलीस अमलदार वैशाली नागवडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १५ ऑक्टोबरला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी मूळ भाडे करार करणे आवश्यक आहे. मात्र, शासकीय फी वाचवण्यासाठी आरोपीने मूळ दस्ताऐवजात बदल केला. पीडीएफमध्ये एडिटिंग करुन दुसर्‍याचे प्रमाणपत्र संबंधिताचे असल्याचे भासवले. पोलीस तपासणीवेळी हा फेरफार लक्षात आला. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×