Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : पुण्यात ३० लाखांची रोकड हिसकावून नेली, २२ दिवसांनी गुन्हा दाखल

Pune Birthday Dispute Attack

मार्केटयार्डमध्ये तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून रोकड लुटली; वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : हवालाचे पैसे घेउन जाणार्‍या तरूणाला अडवून त्याच्या तोंडावर स्प्रे मारुन तब्बल ३० लाखांची रोकड असलेली बॅग टोळक्याने हिसकावून नेल्याची घटना ७ ऑक्टोबरला घडली होती. मात्र, तब्बल २२ दिवसानंतर याप्रकरणी आता मार्केटयार्डयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिस आयुक्तांचा दणका; दोन अधिकार्‍यांसह तिघांचे निलंबन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तक्रारदार श्रवण देवासी (वय २२, रा. मार्केटयार्ड ) हे ७ ऑक्टोबरला ३० लाखांची रोकड बॅगेतून घेउन जात होते. त्यावेळी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्डमधील शिवनेरी रस्त्यावर दोन दुचाकीवर आलेल्या पाचजणांनी श्रवणला अडवले. त्याच्या तोंडावर स्प्रे मारुन रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी तरुणाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले होते. संबंधिताने मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात धाव घेउन घटना सांगितली. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला नाही. वारंवार चकरा मारुनही तरुणाला दाद दिली नाही. अखेर हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर गेले. त्यानंतर संबंधिताची बदली करण्यात आली, तर २२ दिवसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×