ऐन दिवाळीत बेशिस्तांविरुद्ध कारवाईचा धडका
marathinews24.com
पुणे – Pune Police News : शहरातील कायदा सुव्यवस्थेसह वर्दीला डाग लावणार्या बेशिस्त कर्मचारी आणि अधिकार्यांविरुद्ध पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ऐन दिवाळीच्या उत्सवात दोन अधिकार्यांसह तिघांचे निलंबन करत दणका दिला आहे. संबंधितांनी कामात हलगर्जीपणा आणि कुचराई केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हवाला प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिकेवरून मार्वेâटयार्डच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दुसर्या प्रकरणातील महिला पोलीस उपनिरीक्षक, कर्मचार्याचे निलंबन केले आहे.
पुण्यात मेट्रोच्या कामाला बेशिस्त वाहन चालकांचा अडथळा – सविस्तर बातमी
मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना ३० लाखांचे हवाला प्रकरण भोवले असून, त्यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांपुर्वी (दि. ७ ऑक्टोबर) तक्रारदार श्रवण देवासी व गणपत देवासी हे दुचाकीवरून जात असताना टोळक्याने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारुन ३० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. त्यावेळी उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे हे कर्मचार्यांसह घटनास्थळी गेले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार कागदावर लिहून घेतली. कॅमेरे पाहून तुमचा गुन्हा दाखल करू असे तक्रारदाराला सांगितले. प्रत्यक्षात गुन्हा दाखल केला नाही. अनेकदा तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात चकरा मारल्या. मात्र, अधिकार्यांनी त्यांचा दरोड्याचा गुन्हा दाखल न करता प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली. घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता, घटना खरी असल्याचे उघडकीस आले. पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत जगताप यांना निलंबित केले.
गंभीर गुन्ह्यात हलगर्जीपणा, महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित
फुरसुंगी पोलिस ठाण्यात कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कचरू जाधव यांनाही निलंबित केले आहे. गंभीर गुन्ह्यांचा तपास असताना त्यांनी तपासात अनेक त्रुटी ठेउन अक्ष्यम चुका केल्याचे तपासात उघडकीस आले. संबंधित प्रकरणात आरोपीने उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज सादर केल्यानंतर तपासी अधिकारी म्हणून त्रोटक व मोघम स्वरूपाचा अहवाल न्यायालयात सादर केला. तसेच सुनावणीसाठी स्वत: न्यायालयात हजर रहाणे अपेक्षित असताना न राहिल्याने त्यांना दोषी धरुन निलंबित करण्यात आले.
डांगडांगचा महिला अमलदाराचा व्हिडिओ व्हायरल, अमलदार निलंबित
मद्यपान करून चारचाकी गाडी विरूद्ध दिशेने चालवित पदपथावरील नागरिकांना शिवीगाळ करणे महिला पोलीस अमलदाराला भोवले आहे. शिवीगाळ केल्याप्रकरणी महिला कर्मचारी अश्विनी केकान यांना निलंबित केले आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अश्विनी केकान या काळेपडळ पोलिस ठाण्यात नेमणूकीस होत्या. त्या दोन दिवस रजेवर असताना ही घटना घडली.























