तरुणाला बेदम मारहाण, टोळक्याविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – पोलिसांचा खबरी असल्याच्या आरोप करुन टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी परिसरात घडली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
डोहाळ जेवणात ११ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
करण शंकर गावडे (वय १९), आदित्य संतोष इंगोले (वय २४) यांच्यासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राेहित सुभाष जावळकर (वय ३२, रा. सीतादेवीनगर, म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळकर घराजवळ थांबला असताना आरोपी गावडे, इंगोले आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार तेथे आले. ‘तु पोलिसांचा खबरी आहे’, असा आरोप करुन आरोपी गावडे, इंगाेले आणि साथीदारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जावळकर याच्या घराच्या परिसरातील गाड्यांची तोडफोड करुन दहशत माजविली. घटनेनंतर परिसरात घबराट उडाली होती. पोलिसांनी आरोपी इंगोलेला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.