Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

पुण्यात अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात वाहतूक बदल

Pune Traffic Diversion

१५ सप्टेंबरला पहाटेपासून प्रमुख रस्ते बंद व पर्यायी मार्गांची व्यवस्था

marathinews24.com

पुणे – महिलांच्या अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी पहाटे पाचनंतर अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून ऋषी पंचमीनिमित्त मंगळवारी पहाटे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माेठ्या संख्येने महिला भाविक सहभागी होतात.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचे ज्ञान, सामूहिक सजगता आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (जिजामाता चौक ते रामेश्वर चौक), अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरातील विजय मारुती चौक ते बेलबाग चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजीबाबा मंदिर चौकातून उजवीकडे वळून महाराणा प्रतापसिंह रस्ता, हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून मंडईतील गोटीराम भैय्या चौकातून स्वारगेटकडे जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहन चालकांनी अप्पा बळवंत चौकमार्गे बाजीराव रस्ता, फुटका बुरुज चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी रस्ता, जिजामाता चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहन चालकांनी सोन्या मारुती चौकातून बोहरी आळी, मिर्झा गालिब चौकमार्गे, नेहरू चौक, गोटीराम भैय्या चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×