Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Bank Fraud : तरुणाच्या बँक खात्यातील रक्कम परस्पररित्या वळवून फसवणूक

Pune Bank Fraud

बँक खातेधारक आणि वापरकर्त्यांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Bank Fraud : तरुणाच्या बँकखात्यातील तब्बल ५ लाख ६८ हजारांची रोकड परस्पररित्या वळवून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २७ ऑक्टोबरला संध्याकाळी चारच्या सुमारास पर्वती परिसरात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी बँकखातेधारक व वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा तस्करीच्या तयारीतील दोघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण पर्वती परिसरात राहायला असून, २७ ऑक्टोबरला संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांना बँकेतून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आला. (Pune Bank Fraud) आरोपींनी तक्रारदाराच्या परवानगीशिवाय परस्पररित्या बँकखात्यातून तब्बल ५ लाख ६८ हजार रुपये वर्ग करुन घेतले. त्यांची फसवणूक केली असून, याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

लोहगावात घरफोडी, ३ लाखांचे दागिने लंपास

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना २७ ते २८ ऑक्टोबरला लोहगावातील संतनगरमध्ये असलेल्या बेलीटो होम्स मध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकी परिसरात राहणार्‍या नागरिकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×