Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अमित लुंकडसह ३० ते ४० जणांवर गुन्हा

घरात चोरी करणार्‍या केअर टेकरला अटक

जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न; वडगाव शेरीतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील वडगाव शेरी परिसरात ३० ते ४० जणांच्या टोळीने खासगी प्लॉटमध्ये शिरकाव करून बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, लुंकड याचा मॅनेजरसह ३० ते ४० साथीदारांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईट्स, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंडचे गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मध्ये गुरूवारी (दि. ७) सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास घडली. बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत यापूर्वी अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत.

टेम्पो चोरी करणाऱ्या दोन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दुगड यांचा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांनी वडगाव शेरी सर्व्हे नंबर ३० मधील ४० गुंठे जागा गलांडे व इतर ७ जणांनी तालेरा यांचे कडून सामाईकपणे घेतली होती. १९९५ ते २००२ पर्यंत त्यापैकी सुमित राठोड यांनी ३४.५ गुंठे जागा खरेदी केली होती. उर्वरित जागा ही लुंकड यांनी खरेदी केली होती. २०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडुन ३१ गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावे व ३.५ गुंठे तेजस प्रवीण दुगड यांच्या नावाने खरेदी खताने खरेदी केली होती. दुगड यांनी जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेच्या ७/१२ वर त्यांचे नाव लागले आहे. तसेच जागा खरेदी करताना या जागेवर सुमित राठोड यांच्या ७ प्लॉटला सात प्रॉपर्टी टॅक्स होते. ते सुद्धा दुगड यांच्या नावावर केलेले आहे. तसेच सुमित राठोड यांच्या नावाचे दोन लाईट मीटर व वॉटर मीटर होत. ते फिर्यादी यांच्या नावावर करुन घेतले होते. या जागेवर बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाकडे एमओडीची एनओसी घेतली. फायरची प्रोव्हिजनल एनओसी घेतली. पुणे महापालिकेकडे जवळपास ५ कोटी रुपये चलन भरलेले आहे. गौण खनिजची परवानगी घेऊन रॉयल्टीचे पैसे भरले. त्यानंतर या जागेवर कंट्रोल ब्लास्टिंगची परवानगी घेतली आहे. जागेवर बांधकामासाठी सर्व परवानग्या घेऊन दोन महिन्यांपासून काम चालू केलेले आहे. त्याठिकाणी सध्या काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्याकरिता दोन सुपरवायझर, दोन वॉचमन, सिनिअर इंजिनिअर यांची नियुक्ती केली आहे.

नेमकी घटना काय घडली

७ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ दुगड यांना सुपरवायझर विशाल पवार याने फोन करुन कळवले की, अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा मॅनेजर व इतर ३० ते ४० जण आठ-दहा ट्रॅक्टर, दोन-तीन डंपर, वॉटर टँकर घेऊन आलेले असून त्यांनी साईटचे समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. त्यांनी त्यांची सर्व वाहने आपल्या प्लॉटमध्ये घुसवली आहेत. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा तातडीने वडगाव शेरी येथील प्लॉटवर गेले असता पोलिसही तेथे आले. तेव्हा तेथे अमित लुंकड याने बरोबरच्या लोकांना फिर्यादीला मारण्याच्या धमक्या देऊन इथून तुम्ही निघून जावा, हा आमचा प्लॉट आहे, असे सांगितले. पोलिसांनी फिर्यादी व अमित लुंकड यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा फिर्यादी यांनी अमित लुंकडच्या गाडीमध्ये हत्यारे आहेत, असे म्हटले असता, तसेच फिर्यादी यांच्या बंदुके नावाच्या वॉचमनला मारहाण केल्यामुळे अमित लुंकड गाडीमध्ये बसून पळून गेला.

लुंकड आयुक्तांच्या नावे देत होता धमक्या

प्लॉटवर आलेल्या अमित लुंकड याने दुगड यांच्या कर्मचाऱ्यांना, फिर्यादींना तसेच आलेल्या विमानतळ पोलिसांना पोलिस आयुक्तांच्या नावाने धमक्या दिल्याचे फिर्यादींनी सांगितले. पोलिस आयुक्तांना याबाबत कोणतीही कल्पना नसताना उपस्थितांकडे त्यांच्या नावाचा वापर करत, तसेच त्यांना फोन लावल्यासारखे भासवत तो परिसरात दहशत माजवत होता, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न, धमक्या, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×