Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

पुण्यातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

marathinews24.com

पुणे – शहरातील प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक नवोदित शास्त्रज्ञांवर शोककळा पसरली आहे. १९६० सालापासून साने यांनी आपल्या आयुष्यात कधीही विजेचा वापर केला नाही. लाईट, टीव्ही, फ्रीज यांसारखी कोणतीही वीजेवरील उपकरणे त्यांनी कधीच वापरली नाहीत.

बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा – सविस्तर बातमी

पुण्यातील मध्यवर्ती बुधवार पेठेतील जुन्या घरात त्यांचे वास्तव्य होते. हिरवाई, झाडे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटातच त्यांनी आपले आयुष्य घालवले. वनस्पतीशास्त्रात एम.एस्सी. व पीएच.डी. मिळवल्यानंतर भारतविद्या शास्त्रात एम.ए. व एम.फिल. या पदव्या देखील त्यांनी प्राप्त केल्या होत्या. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. दिवसाच्या सूर्यप्रकाशात, आपले हिरवे मित्र, बुद्ध परंपरा आणि बोधीवृक्ष, पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष अशा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×