Breking News
LokSamvad 2026 Baramati : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृतीफ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपासPune Crime : पसार झालेल्या फरार आरोपीला पकडलेPune Traffic Changes : गणेशोत्सवात पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीस बंदLokSamvad 2026 Pune : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभPune Crime News : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीलाDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीSantosh Pandit : पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित यांना जामीनसमाजात समानता, एकोपा सौख्य नांदावे; श्री गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे साकडेविद्यार्थी वाहतूक करणार्‍या एसटीचा अपघात

Pune Crime : पसार झालेल्या फरार आरोपीला पकडले

Pune Crime : पसार झालेल्या फरार आरोपीला पकडले

गणेश मंडळाच्या मिरवणुकीत नाचताना गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले

marathinews24.com

पुणे –  वडारवाडी परिसरात एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन पसार झालेल्या फरार आरोपीला गुन्हे शाखेने पकडले. (Pune Crime) प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त एका मंडळाच्या मिरवणुकीत नाचत असताना फरार आरोपीला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.

गणेशोत्सवात पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीस बंद – सविस्तर बातमी 

इस्माईल इब्राहिम शेख (वय २२, रा. श्री बसवेश्वर मठाजवळ, जुनी वडारवाडी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्या प्रकरणी शेख याच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेले सहा महिने तो फरार होता. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका मंडळाकडून प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी शेख हा वडारवाडीतील श्री बसवेश्वर मठाजवळ मिरवणुकीत नाचत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शेख याला सापळा लावून पकडले.  Pune Crime  शेख याला या प्रकरणात चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धीरज राऊत, बाबासाहेब दांगडे, प्रमोद जगताप, संतोष नांगरे, संतोष अनुसे यांनी ही कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या २६ जणांविरुद्ध गुन्हा

Pune Crime : शहरातील मुंढवा परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या २६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समाज माध्यमात मुंढवा भागात मोकळ्या जागेत काही जण मद्यप्राशन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली हाेती. मोकळ्या जागेत दररोज सायंकाळी मद्यपींची गर्दी होत होती. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुंढवा पोलिसांच्या पथकाने मोकळ्या जागेत मद्यप्राशन करणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम (८५), (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, गुन्हे शाखेचे निरीक्षक सागर गोडे, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, अशोक घेगडे, विनोद साळुंके, संभाजी शितोळे, चेतन गायकवाड, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर, विशाल बनकर, योगेश गायकवाड यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×