सराईताला खडक पोलिसांकडून अटक
marathinews24.com
पुणे – एमपीडीएनुसार पोलिसांनी केलेल्या स्थानबद्धतेच्या कारवाईतून जेलबाहेर जामिनावर येताच आरोपीने वाहन चोरी केली. Pune Crime News : याप्रकरणी खडक पोलिसांनी संबंधित तडीपार असलेल्या चोरट्याला पुन्हा वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्याकडून ७० हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली असून, हा गुन्ह्या त्याने पत्नीच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे. वसीम सलीम पटेल (वय ४२, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली – सविस्तर बातमी
Pune Crime News भवानी पेठेतील किराड आळीतून चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्याची घटना २१ सप्टेंबरला घडली होती. तक्रारदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. एएसआय विनोद शिंदे आणि हेमंत पेरणे यांना संबंधित गुन्हा सराईत वसीम पटेल याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने २३ सप्टेंबरला कोंढव्यातून त्याला ताब्यात घेतले.
त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली असून, पत्नीसोबत हा गुन्हा केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, एसीपी सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक समाधान पवार, एपीआय प्रसन्न जर्हाड, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहूल मखरे, मयूर भोसले, अमित जमदाडे, नीलेश साबळे, उमेश मठपती, सैपुनमुलूख नदाफ, विकास पांडोळे यांनी केली.
सराईताविरुद्ध १४ गुन्हे दाखल, २०२५ पासून तडीपार
सराईत वसीम पटेल याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल आहेत.त्यापार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या दाखल गुन्ह्यात २०२५ मध्ये आरोपी पटेल याला तडीपार केले होते. मात्र, तडीपार कारवाईचे उल्लंघन करीत त्याने कोंढव्यात येउन वास्तव्य केले. तसेच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे.





















