गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील सिंहगड रस्ता परिसरात सहा वर्षांपूर्वी एकाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्ह्यात पसार झालेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने पकडले. वडगाव बुद्रुक परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुधीर बुद्धीराम विश्वकर्मा (वय ३१, रा. टेल्को काॅलनी, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्वकर्मासह साथीदारांविरुद्ध २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या – सविस्तर बातमी
गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा वर्ष विश्वकर्मा हा पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस कर्मचारी पांडुरंग शिंदे आणि तुषार किंद्रे हे सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. विश्वकर्मा हा वडगाव बुद्रुक भागात येणार असल्याची माहिती शिंदे आणि किंद्रे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नानासाहेब कदम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पांडुरंग शिंदे, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला, आशिष राठोड यांनी ही कारवाई केली.
गंभीर गुन्ह्यातील फरारी अटकेत
मार्केट यार्ड परिसरातील गंभीर गुन्ह्यात गेले एक वर्ष पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. आकाश किशोर नवगीर (वय २७, रा. टिळेकरनगर, कात्रज कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मार्केट यार्ड परिसरात वर्षभरापूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यात आकाश पसार झाला होता. तो कात्रज भागात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे, आकाश यादव यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, अविनाश माने, शंकर नेवसे, महेश मंडलिक, ओंकार कुंभार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, विजय पवार यांनी ही कारवाई केली.






















