Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : पुण्यातील कॅम्प, कोथरुडमध्ये घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज चोरीला

Pune House Burglary

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : शहरातील कॅम्प परिसरासह कोथरुडमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करीत चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी कोथरुड आणि लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वादातून एकाच कुटुंबातील ६ जणांना मारहाण – सविस्तर बातमी 

कोथरुडमधील तेजसनगरात असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ५४ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना ९ ते १० ऑक्टोबर कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनाजी डोंब तपास करीत आहेत.

कॅम्पमधील मोदीखाना परिसरात असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना १२ ऑक्टोबरला घडली असून, ३२ वर्षीय नागरिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मोदीखाना परिसरात राहायला असून, १२ ऑक्टोबरला त्यांचे घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे पावणेदोन लाखांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.

वानवडीत वाईन शॉपी फोडली, पावणे सात लाखांचा ऐवज चोरीला

वानवडीतील जगताप चौक परिसरातील असलेल्या वाईन शॉपी दुकानाचे शटर आणि कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील रोकड, कॅश लॉकर आणि अन्य मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ६ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीची रोकड व वस्तूंचा समावेश आहे. ही घटना ११ ते १२ ऑक्टोबरला प्रâेन्च वाईन शॉपमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसरमध्ये राहायला असून, वानवडीतील अनुसाया एन्क्लेव सोसायटीत त्यांचे वाईन शॉप आहे. ११ ते १२ ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी शॉपचे शटर कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. लॉकरमध्ये साडेसहा लाखांची रोकड, लॉकर, सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदाराला दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×