Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : घटस्फोटासाठी पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडले

Pune Crime News

पुण्यात पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांसाठी, फ्लॅट खरेदीसाठी महिलेवर सासरच्या मंडळींनी दबाव टाकला. तसेच पतीने दुसरे लग्न करणार असल्याचे सांगून तिला घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव आणल्याने महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना केशवनगर, मुंढवा भागातील ‘व्यंकटेश ग्राफिटी’ सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीसह सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नणंद शैली संजय सकपाळ (वय ३१, रा. ओशिवरा, अंधेरी, मुंबई) हिला मुंबईतून अटक केली आहे.

पुण्यात आईने मुलीला देहविक्रीस प्रवृत्त केले –  सविस्तर बातमी 

त्रिष्णा बाळकृष्ण निकम (सासरचे नाव – त्रिष्णा राहुल सकपाळ, वय ३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण जयराम निकम (वय ७४, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ, आजी सासू शकुंतला साळुंके यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णाला सासरच्या मंडळींकडून २०१८ पासून वारंवार पैशांसाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्रास दिला जात होता. तिच्या वडिलांच्या नावावर असलेला व्यंकटेश ग्राफिटीमधील फ्लॅट नावावर करून देण्यासाठी दबाव आणला गेला. Pune Crime News  पती राहुलला दुसरे लग्न करायचे असल्याने त्याने त्रिष्णाला घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव टाकला. तसेच नणंदेच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला होता.

सासरच्या सततच्या शारीरिक, मानसिक त्रासाला आणि अपमानास्पद वागणूकीला कंटाळून त्रिष्णाने २९ सप्टेंबरला राहत्या घरात गळफास घऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्रिष्णा निकम यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पतीसह सासरच्या सर्व आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आणि तिच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. मोबाईलमध्ये आरोपींसोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना आढळून आले आहे.

मुंढवा पोलिसांनी आरोपी नणंद शैली सकपाळ हिला ३ ऑक्टोबरला मुंबईतील अंधेरी येथून अटक केली. अंधेरी रेल्वे मोबाईल कोर्टाकडून तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवून तिला पुण्यात आणले आहे.फरार आरोपींचा शोध घेणे, आर्थिक व्यवहारांचा तपास करणे, आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी शैली सकपाळ हिची पोलिस कोठडी रवानगी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा निमकर करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×