Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Crime News : मैत्रीणीसोबत झाला वाद, तिच्या भावडांनी तरुणावर केला वार

Pune Crime News

वाघोलीतील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : तरुणीसोबत झालेला वाद मिटवण्याच्या नावाखाली तिच्या दोन भावांसह पाच जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केल्याची घटना १४ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास वाघोलीतील ग्रीन नाईन हॉटेलसमोर घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूरमध्ये चोरट्याकडून गोळीबार; व्यापारी जखमी – सविस्तर बातमी 

विपूल कदम (वय २८ रा. वाघोली ) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सुर्यवंशी आणि स्वप्नील सूर्यवंशी दोघेही (रा. घोरपडी गाव) यांच्यासह इतर तिघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. आकाश कदम (वय ३० रा. वाघोली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आकाशचा भाउ विपुल हे कुटुंबियासह वाघोलीतील केसनंद परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी विपूलचे त्याच्या मैत्रिणीसोबत वादविवाद झाले होते. त्याच रागातून १४ ऑक्टोबरला मैत्रिणीच्या भावडांनी विपुलला वाद मिटवण्यासाठी ग्रीन नाईन हॉटेल जवळ बोलावले. त्यावेळी टोळक्याने विपुलला बेदम मारहाण केली. त्यानंतर मैत्रिणीच्या भावडांनी विपुलवर धारदार शस्त्राने वार करुन खुनी हल्ला केला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या विपुलला सोडून टोळके पसार झाले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस तपास करीत आहेत.

जादा परताव्याच्या आमिषापोटी ३२ लाख गमावले

Pune Crime News : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ३२ लाख ३० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ मार्च ते २५ मे २०२४ कालावधीत नर्‍हे परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक, बँकखातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नर्‍हे परिसरात राहायला असून, मार्च २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना रक्कम गुंतवणूकीला भाग पाडले. तब्बल ३२ लाख ३० हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने नर्‍हे पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×