Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Shirur Crime News : शिरूरमध्ये चोरट्याकडून गोळीबार; व्यापारी जखमी

Bibwewadi Firing Case : अल्पवयीनाकडून झालेल्या गोळीबारात तरुण जखमी

चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न करताना व्यापाऱ्यावर गोळीबार

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील शिरूर शहरातील आनंद सोसायटी परिसरात चोरट्याने केलेल्या गोळीबारात व्यापारी जखमी झाले. शुक्रवारी (दि. १६) पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिरूर शहरात खळबळ उडाली. व्यापारी उमेश चंदनमल छाजेड (वय ४५) हे गोळीबारात जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी चोरट्याशी प्रतिकार करणारी त्यांची १२ वर्षांची मुलगी मानवी हिलाही चोरट्याने मारहाण केली. या घटनेत तिच्या हाताला दुखापत झाली.

वढू गावात अल्पवयीनांकडून तरुणाचा खून; तिघे ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाजेड हे पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. चोरट्याने त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. घरात चोर शिरल्याचे लक्षात येताच छाजेड तातडीने पुन्हा बंगल्यात आले. यावेळी त्यांची चोरट्याशी झटापट झाली. त्यातून चोरट्याने केलेल्या गोळीबारात छाजेड जखमी झाले. दरम्यान, वडिलांना वाचविण्यासाठी मानवी हिनेही चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने तिलाही मारहाण केली. या झटापटीत तिच्या हाताला दुखापत झाली.

घटनेपूर्वी चोरट्याने अजित ओस्तवाल यांच्या बंगल्याच्या बाल्कनीतून घरात प्रवेश करून कपाट फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. एकाच परिसरात घरफोडी आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी ही पहाटे भाजी बाजार परिसरात दुचाकी वरून आलेल्या चोरट्याने घरासमोर उभ्या असलेल्या महिलेस बंदूक दाखवून चोरीचा प्रयत्न केला होता. संबंधित महिलेने आरडा ओरड केल्याने चोरीच्या प्रयत्न फसला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×